रणरागिणींची प्रतिज्ञा : लव्ह जिहादचे बळी होणार नाही आणि कुणालाही शिकार होऊ देणार नाही...
17-Sep-2023
Total Views | 67
मुंबई ः दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने ‘माझे शहर लव्ह, जिहादमुक्त शहर’अंतर्गत राजपुरोहित सत्संग महिला मंडळ भुलेश्वर यांच्यातर्फे रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी लाड वाडी हॉल, सिपी टँक येथे सभा झाली. उपसंपादिका योगिता साळवी यांनी यावेळी लव्ह जिहाद, ड्रग्ज जिहाद म्हणजे काय? त्याची कारणे, धोके आणि दुष्परिणाम, यांवर मुद्देसूद विचार मांडले. ’हिंदू जागरण मंच’चे पदाधिकारी महेश भिंगार्डे, सामाजिक कार्यकर्ता मेघना थरवळ, सारिका जगडिया यांच्यासह राजपुरोहित सत्संग महिला मंडळाच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.