ब्लू डार्ट’च्या वतीने त्यांच्या डार्ट प्लस सेवेच्या रिब्रँडिंगची घोषणा, भारत डार्ट नवीन नाव
मुंबई:ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड ही दक्षिण आशियाची महत्त्वपूर्ण एक्सप्रेस एअर आणि इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन तसेच डिस्ट्रिब्यूशन लॉजिस्टीक कंपनी असून त्यांची नवीन सेवा,अगोदर डार्ट प्लस नावाने ओळखल्या जाणाऱ्या सेवेचे नाव भारत डार्ट ठेवण्यात आले.हे रणनीतिजन्य परिवर्तन ब्लू डार्टच्या सुरू असलेल्या प्रवासात अभूतपूर्व मापदंड ठरले,जी भारताच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी आपली अतूट बांधिलकी अधोरेखित करते आहे.
भारत डार्ट ही एक वितरण सेवा वेळेच्या दृष्टीने संवेदनशील आहे जी वेग,सुरक्षितता आणि मूल्यवर्धित वैशिष्ट्यांसह हाताळणीद्वारे समर्थित आहे. ही सेवा मजबूत प्रणाली आणि सुलभ पेमेंट पर्यायांद्वारे शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण दृश्यमानता यासारखे फायदे देते. या सेवेचे रिब्रँड करण्याचा ब्लू डार्टचा निर्णय हा एक व्यापक शोध आणि संशोधन प्रक्रियेतून निर्माण झाला असून ज्याचा उद्देश ग्राहकांच्या विकसीत गरजा पूर्ण करण्याचा आहे.ग्राहकांना आनंद देण्यासाठी कंपनीच्या अतूट समर्पणामुळे एक सुव्यवस्थित आणि पुनर्कल्पित सेवा उपलब्ध झाली आहे.जी ग्राहकांना अपवादात्मक मूल्य प्रदान करण्याचे वचन देते.
'ब्लू डार्ट’चा एक महत्त्वपूर्ण यूएसपी म्हणजे त्यांची हटके पोहोच आहे,देशातील 55,000+ ठिकाणांसह जगभरात 220 देश आणि प्रदेशांत त्यांची सेवा पोहोचते.डिलिव्हरी एनीव्हेअर नाऊ (DAWN) आणि रेव्हेन्यू इंक्रिज फ्रॉम एसएमई अँड इमर्जिंग मार्केट्स (RISE) सारख्या उपक्रमांद्वारे ब्लू डार्ट आपल्या सेवा ठिकाणांचा लक्षणीय विस्तार भारतामधील टियर II आणि टियर III शहरांवर विशेष लक्ष केंद्रित ठेवून करते आहे.या शहरांमधील वाढीचा नवीन मध्यमवर्गाचा उदय आणि उपभोग संस्कृतीशी जवळचा संबंध आहे.आर्थिक वर्ष-23 मध्ये, एकूण ई-कॉमर्स बाजारपेठेची टक्केवारी पाहिल्यास टियर II आणि टियर III शहरांचा वाटा अनुक्रमे 18.6% आणि 37.1% होता, या क्षेत्रात आणखी प्रगती होण्याचा अंदाज आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना सीईओ – डीएचएल ईकॉमर्सचे पाबलो सीआनो म्हणाले, “भारत 2047 दरम्यान शतकपूर्ती करत असून ईकॉमर्स आणि लॉजिस्टीक क्षेत्रावरील लक्ष्य सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. आमच्या डीएचएल ग्रुपची रणनीति 2025 अनुसार ई-कॉमर्स हा मेगाट्रेंड ठरेल आणि आमचे उद्दिष्ट ‘कनेक्टिंग पीपल, इम्प्रूविंग लाईव्हज्’ प्रती वचनबद्ध राहण्याचे आहे.आमच्या अखंड वितरण पर्यायांद्वारे सक्षम केलेल्या जागतिक स्तरावर टियर II आणि टियर III शहरांमध्ये भारतातील लहान व्यवसाय आणि MSMEs द्वारे देऊ करण्यात येणारी अद्वितीय उत्पादने आणि सेवा स्पॉटलाइट करण्याच्या अफाट क्षमतेवर आमचा ठाम विश्वास आहे.ही दृष्टी सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाशी अखंडपणे सुसंगत आहे.”
ब्लू डार्ट’चे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफर मॅनुअल पुढे म्हणाले, “भारताने अलीकडे G20 अध्यक्षपद भूषविले एक मोठा परिवार म्हणून वाढ, कार्यक्षमता आणि लवचिकता यांचा ताळमेळ साधण्याची गरज निर्माण झाली.'वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर' ही एकता आणि उद्देश अधोरेखित करणारी सरकारची दृष्टी,ब्लू डार्टच्या फॉरवर्ड-थिंकिंग पध्दतीला अखंडित साजेशी आहे.ती लॉजिस्टिक उद्योगात ट्रेलब्लेझर म्हणून स्वत:चे स्थान मजबूत करते.हे रिब्रँडिंग आमच्यासाठी एक रोमांचक परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते.कारण आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा देत आहोत.भारत डार्ट हे आमच्या कंपनीसाठी आणि आमच्या देशासाठी नवीन आणि रोमांचक अध्यायातील पहिले पाऊल आहे.आमची क्षमता वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे एकूण ग्राहक अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही आमच्या कौशल्याचा लाभ घेण्यासाठी समर्पित आहोत."
भारत डार्ट भारतातील एक्सप्रेस लॉजिस्टिक्स सेवा पुन्हा परिभाषित करण्यासाठी तयार आहे,ती सर्व आकारांच्या व्यवसायांसाठी अतुलनीय वेग, कव्हरेज आणि समर्थन प्रदान करते. ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड सर्व भागधारक आणि ग्राहकांना या परिवर्तनीय प्रवासात सामील होण्यासाठी आमंत्रित करते. कारण कंपनी भारताला जगाशी आणि जगाला भारताशी जोडते आहे.