कॅनडाचे पंतप्रधान मायदेशी रवाना; विमानातील तांत्रिक बिघाड झाला दूर

    12-Sep-2023
Total Views |

Justin Trudaue


नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून भारतात अडकून पडलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो अखेर त्यांच्या मायदेशी रवाना झाले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दिल्ली येथे आयोजित जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी जस्टीन ट्रुडो भारतात आले होते.
 
परंतू, सीएफसी००१ या त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे त्यांना भारतातच थांबावे लागले होते. मात्र आता पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या विमानातील तांत्रिक बिघाड दुर झाला आहे. त्यामुळे ते आपल्या देशाकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, जस्टीन ट्रुडो यांच्या विमानात बिघाड आल्यामुळे कॅनडामधून त्यांच्यासाठी आणखी एक खास विमान येणार होते. परंतु, त्यांचे विमान दुरुस्त झाल्याने ते त्यातच आपल्या देशात परत गेले आहेत.