दिल्ली : राजधानी दिल्ली येथे नुकतीच जी-20 परिषद पार पडली. त्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोघांमध्ये अनेक मुद्दांवर चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यातील चर्चेत ऊर्जा, संरक्षण, कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली. तसेच 50 अब्ज डॉलरचा वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प वेगाने पुर्ण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. याअंतर्गत महाराष्ट्रात रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे.
यावेळी दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच दोन्ही देशांमध्ये राजकारण, सुरक्षा, संरक्षण, व्यापार आणि अर्थव्यवस्था या मुद्द्यांवरही चर्चा झाली. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा हा दुसरा भारत दौरा आहे.