सौदी अरेबिया भारताचा सर्वांत महत्त्वाचा भागिदार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    11-Sep-2023   
Total Views | 42
 
saudi arebia


 नवी दिल्ली : 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊस येथे सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीझ अल सौद यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली. पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी त्यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही उपस्थित होत्या.

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर सौदीचे राजपुत्र 'भारत-सौदी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल' च्या (एसपीसी) बैठकीत सहभागी झाले. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत भारत आणि सौदी अरेबियामधील द्विपक्षीय व्यापार आणि संरक्षण संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर चर्चा झाली. मोहम्मद बिन सलमान म्हणाले की, मला भारतात येऊन खूप आनंद होत आहे. मला जी२० शिखर परिषद यशस्वी झाल्याविषयी भारताचे अभिनंदन करायचे असून भविष्यातही भारतासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले.

बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतासाठी सौदी अरेबिया हा आमच्या सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था या नात्याने संपूर्ण प्रदेशाच्या शांतता आणि स्थिरतेसाठी आमचे परस्पर सहकार्य महत्त्वाचे आहे. चर्चेत आम्ही आमची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही आमच्या व्यापार संबंधांचे पुनरावलोकन केले आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या राष्ट्रांमधील व्यावसायिक संबंध पुढील काळात आणखी वाढतील. ग्रीड कनेक्टिव्हिटी, नवीकरणीय ऊर्जा, अन्न सुरक्षा, सेमीकंडक्टर आणि पुरवठा साखळी यामध्ये सहकार्याची संधी खूप मोठी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
परिषदेच्या अंतर्गत दोन्ही समित्यांच्या अनेक बैठका झाल्या, त्यामुळे आमचे परस्पर सहकार्य सतत वाढत आहे. बदलत्या काळाच्या गरजांनुसार रोज नवनवीन आणि आधुनिक आयाम जोडत आहोत. अशा प्रकारच्या बैठकांसाठी 2019 मध्ये सौदी अरेबियाच्या भेटीदरम्यान परिषदेच घोषणा करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांत या परिषदेने दोन्ही देशांची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविली असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121