जी-20 परिषदेत चमकल्या नक्षलग्रस्त 'बस्तर'च्या महिला; परदेशी पाहुण्यांनीही घेतली दखल

    10-Sep-2023
Total Views | 114

Millet mission

दिल्ली : नुकतीच ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्ली येथे जी-20 बैठक पार पडली. यात अनेक देशांतील प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. जी-20 परिषदेदरम्यान, भारतीय संस्कृती, कला, खानपान, पोशाख इत्यादी अनेक गोष्टींची परदेशी पाहुण्यांना ओळख करून देण्यात आली.
 
यात 'मिलेट मिशन'वर विशेष लक्ष देण्यात आले. जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीही उपस्थित झाल्या होत्या. त्यांना ९ सप्टेंबर रोजी पुसा रोडवरील IARI संकुलात कृषी प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी छत्तीसगडमध्ये बनवल्या जाणार्‍या उत्पादनांची मनसोक्त खरेदी केली.
 
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील महिलांनी भडधान्यांपासून अनेक पदार्थ बनवले होते. परदेशी पाहुण्यांना हे पदार्थ खूप आवडले. बस्तर जिल्ह्यातील एका महिलेने सांगितले की, तिने भडधान्यांचे लाडू, नाचणीचे कुकीज, नाचणीची चकली, कोदो-कुटकी इत्यादी पदार्थ तयार केले आहेत.
 
तसेच ऑस्ट्रेलियाच्या फर्स्ट लेडीला भडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांची टोपली भेट दिली असल्याचेही तिने सांगितले. छत्तीसगड कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्तीसगड कृषी विभागाने पुसा येथे एक स्टॉल देखील लावला होता. या स्टॉलमध्ये बांबूपासून बनवलेले सुप, टोपली, छत्री यांसह भडधान्यांपासून बनवलेली उत्पादनेही ठेवण्यात आली होती.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा