ऋषी सुनक यांनी घातले भारतीय कंपनीचे हेडफोन; कंपनीच्या सीईओंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

    10-Sep-2023
Total Views |

Rushi Sunak


दिल्ली : राजधानी दिल्ली येथे जी-20 परिषद सुरु असून आज या परिषदेचा दुसरा म्हणजेच शेवटचा दिवस आहे. या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रतिनिधी भारतात दाखल झाले आहेत. यातच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेदेखील या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत.
 
ऋषी सुनक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अक्षता मुर्ती यासुध्दा आहेत. यादरम्यान, ऋषी सुनक हे ब्रिटीश काऊन्सिल ऑफ इंडियामध्ये विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवताना दिसले. या भेटीचे फोटो त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ऋषी सुनक यांनी बोट कंपनीचे हेडफोन घातलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
 
बोट कंपनीचे सीईओ अमन गुप्ता यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमन गुप्ता यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ऋषी सुनक यांच्या फोटोचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात अमन गुप्ता यांनी 'भारतात आपले बोट बोट स्वागत' असे लिहीले आहे.