महाराष्ट्र : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा, अमरावती येथील युवा स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचून दाखविला. ते म्हणाले, राज्य सरकारने राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं असून राज्यात विकासकामे होत असून सरकारने अमरावतीला भरभरून दिल्याचे ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, आ. रवी राणा यांनी अमरावतीमध्ये दहीहंडीचं आयोजन केले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित लावली. यावेळी फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांच्या नेतृत्वात देश प्रगती करत असून राज्य सरकार विकासासाठी कटिबध्द असल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला. त्याचबरोबर ७० वर्षांत जे अमरावतीला मिळालं नाही ते आमच्या सरकारने दिल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
तसेच, हनुमान चालीसा बोलण्यावर बंदी घालणाऱ्यांवर फडणवीसांनी हल्लाबोल केला. हनुमान चालीसा म्हटल्यामुळे राणा दाम्पत्यांना जेलमध्ये जावं लागलं. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाहीतर काय पाकिस्तानात म्हणायची का, असे सांगतानाच मोदींच्या राज्यात पाकिस्तानातदेखील हनुमान चालीसा म्हटली जाईल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.