बायडेन सोबत दिसले नितीश कुमार; मोदींच्या 'या' कृतीचे होत आहे कौतुक

    10-Sep-2023
Total Views |
g20 nitish kumar 
 
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० नेत्यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जी-२० नेत्यांसह केंद्रीय मंत्री आणि अनेक मुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो समोर आले आहेत. पण एका फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वास्तविक, या फोटोमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन एकत्र दिसत आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, डिनर कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींनी स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि हेमंत सोरेन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी ओळख करून दिली. फोटोमध्ये सर्व नेते हसताना दिसत आहेत.
 
विशेष म्हणजे नितीश कुमार हे विरोधी आघाडीचे प्रमुख चेहरा असून विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील विरोधी आघाडीचा एक भाग आहेत, परंतु असे असतानाही पंतप्रधान मोदी यांनी पक्षीय राजकारणाच्या वरती उठून दोन्ही मुख्यमंत्र्यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट घडवून आणली, हे भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे.