पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

    01-Sep-2023
Total Views |
india's first indigenous 700 MWe N-plant starts working

नवी दिल्ली :
भारतातील पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्यात आला आहे. पहिल्या स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पाने (केएपीपी) वीज निर्मिती सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदनही केले आहे.

पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'भारताने आणखी एक यश संपादन केले. गुजरातमधील 700 मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या सर्वात मोठ्या स्वदेशी काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पाचे युनिट-3 पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

केएपीपी ३ ही ७०० मेगावॅट क्षमतेची पहिली स्वदेशी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर (पीएचडब्ल्यूआर) आहे. ती पूर्णपणे भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी स्वदेशी विकसित केले आहे. सुरतपासून सुमारे 80 किमी अंतरावर गुजरातमधील काक्रापार येथील तापी नदीवर अणुऊर्जा प्रकल्प आहे.

दरम्यान, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने देशभरात प्रत्येकी 700 मेगीवॅटचे 16 पीएचडब्लूआर उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी राजस्थानच्या रावतभाटा आणि हरियाणाच्या गोरखपूरमध्ये बांधकामाचे काम वेगात सुरू आहे. तसेच, मध्य प्रदेशातील चुटका, राजस्थानमधील माही बांसवारा आणि कर्नाटकातील कैगा येथे 10 स्वदेशी विकसित पीएचडब्ल्यूआर बांधण्यास मान्यता दिली आहे.