‘India Clean Air Connect’ : देशाच्या वायू प्रदुषण नियंत्रणासाठी सामायिक व्यासपीठ

    09-Aug-2023   
Total Views |
India Clean air connect
मुंबई (विशेष प्रतिनिधी): देशरातच वायू प्रदुषणाची मोठी समस्या सध्या सर्वत्रच गंभीर होत चालली आहे. वाढत्या वायू प्रदुषणाबाबत काही सक्रिय संस्था आणि वैयक्तीक पातळीवर काम करणाऱ्यांसाठी एक प्रभावी माध्यम ‘इंडिया क्लीन एअर कनेक्ट’ मुळे निर्माण झाले आहे.
भारतात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हवा प्रदुषणामुळे होतात. तसेच, वातावरण बदलाचा आणि वायू प्रदुषणाचा ही फार मोठा संबंध असल्याने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. वायु प्रदूषणावर विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असताना हवा प्रदूषणाची समस्या सर्वसमावेशक पद्धतीने हाताळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. यात, धोरणकर्ते, नागरिक, संस्था आणि इतर घटकांचा समावेश करता येईल. मात्र अशा एकत्रित प्रणाली-स्तरीय कृतीची वायू प्रदूषण क्षेत्रात कमतरता आहे असे अभ्यासातुन लक्षात आले आणि ‘इंडिया क्लीन एअर कनेक्ट’ ची निर्मिती झाली.
सोळा देशांतील १०० हून अधिक शहरांमध्ये हवा गुणवत्ता क्षेत्रात कार्यरत असणारे ३५० हून घटक, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील माहीतीसाठा आणि ज्ञानाचे ७४ स्रोत, या क्षेत्रातील ७० हून अधिक नेटवर्क्स, तसेच देशात कार्यरत संस्था, व्यक्ती आणि संपर्क जाळ्यांना ‘इंडिया क्लिन एअर कनेक्ट’च्या माध्यमातून एकत्रित आणले आहे. हवा प्रदूषणावर सामूहिक माध्यमातून कृती करणे, सर्व संबंधित घटकांनी इकोसिस्टिमबाहेरील घटकांसोबत एकत्र यावे यासाठी इकोसिस्टिम तयार करणे आणि देशभरातल्या या क्षेत्रातील कामामध्ये समन्वय तयार करणे हे या माध्यमातून होईल. संपर्कासाठी हब म्हणून सुविधा निर्माण करणे, विविध उपक्रम, कार्यक्रम, रोजगार संधी, निधी उपलब्धतेच्या शक्यता आणि स्रोत पोर्टल म्हणून हा प्लॅटफॉर्म आधारभूत सुविधा देईल. इंडिया क्लायमेट कोलॅबरेटीव्ह आणि असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्स यांच्या पाठिंब्याने, सेन्सिंग लोकल यांनी हा प्लॅटफॉर्म डिझाईन केला आहे.




समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.