मुंबई : कोरोना काळात नोकरी गमावलेल्या असंघटित कर्मचाऱ्यांना मनरेगाने पुन्हा नोकरी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या योजनेतंर्गत आता जळगावात नोकरीची संधी उपलब्ध होणार असून या माध्यमातून जवळपास १०० हून अधिक पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, मनरेगा जळगाव अंतर्गत भरण्यासाठी संसाधन व्यक्ती पदासाठी भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण १०० पदे भरली जाणार असून उमेदवाराचे कमाल वय १८ ते ५० वर्षे इतके निश्चित करण्यात आले आहे. तसेच, ग्रामीण भागातील उमेदवार शक्यतो ऑफलाईन पध्दतीने अर्ज करतात. परंतु, इच्छुक आणि पात्र उमेदवार १८ ऑगस्टपूर्वी अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२३ आहे. या भरतीकरिता शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर mahaegs.maharashtra.gov.in अर्ज करु शकता.