धर्मांतरासाठी पीडितेच्या वडीलांना इम्तियाजने दिली धमकी, म्हणाला- 'इस्लाम स्वीकार, नाहीतर तुझ्या मुलीला विकून...

    06-Aug-2023
Total Views |
Indore Conversion case

नवी दिल्ली : इंदूरमध्ये एका मुलीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्यात एका व्यक्तिने विजय नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, हैदराबादच्या आयटी कंपनीत इंजिनियर असलेल्या सय्यद इम्तियाजने माझ्या मुलीला ओलीस ठेवून आधी लग्न केले आणि आता तो दोन लाख रुपये न दिल्यास मी मुलीचा धर्म बदलेन, अशी धमकी देत असल्याचे पीडित मुलीच्या वडीलांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी आरोपी इम्तियाजला अटक केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

खरे तर इंदूरमधील एक तरुणी हैदराबादला नोकरीसाठी गेली होती. तेथे तिची इम्तियाजशी ओळख झाली आणि दोघांनी लग्न केले.या प्रकरणी मुलीचे वडील दयाराम गौर यांनी आरोप केला आहे की, हैदराबाद येथील रहिवासी इम्तियाजने एकत्र काम करताना पीडित मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे वैयक्तिक फोटो काढले. यानंतर पीडितेचे धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर इंदूरला आल्यानंतर त्याने मुलीच्या संपूर्ण कुटुंबावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आणि मुलीच्या वडिलांकडे २ लाख रुपयांची मागणीही केली. इम्तियाजने मुलीच्या वडिलांना मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.
 
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. त्यामुळे इम्तियाजने तू आणि तुझ्या पत्नीने सर्वांनी इस्लामचा स्वीकार करा, नाहीतर तुझ्या मुलीला मारून टाकीन, अशी धमकी दिली. वडिलांनी सांगितले की,ते मला माझ्या मुलीशी बोलू देत नाहीत. तेथून निघताना तुमच्या मुलीने इस्लामचा स्वीकार केल्याचे आरोपीने सांगितले. तसेच पीडितेच्या वडीलांनी ऐकले नाही तर तुझ्या मुलीला कुठेही विकेन. तुम्ही काहीही करू शकणार नाही, अशी धमकी ही आरोपीने दिली आहे.
 
याप्रकरणी टीआय रवींद्र गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील दयाराम गौर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाला अटक केली. धर्मांतराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. आता पोलिसांकडे माझी मुलगी परत मिळावी, यासाठी वडीलांनी विंनती केली आहे.

मुलीने इंदूरमधील एका महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलय. तसेच ती व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. हैदराबादच्या कंपनीत तिची निवड झाली होती. ती कामावर गेली, तिथे तिची भेट सय्यद इम्तियाज या तरुणाशी झाली. मुलीने लग्नाची बाब घरच्यांपासून लपवून ठेवली होती. आतापर्यंत मुलाने मुलीला बंधक बनवले होते, असे बोलले जात आहे.