मुंबई : अदानी समुह हिंडनबर्गच्या आरोपातून सावरत नाही तोच आता भारताविरुद्ध कायम गरळ ओकणाऱ्या जॉर्ज सोरोसच्या पैशाने चालणाऱ्या एका संस्थेने नवीन आरोप केले आहेत. अदानी समुहावर आरोप होताच, राहुल गांधी सक्रीय झाले आहेत. राहुल गांधींनी अदानींवर ओसीसीआरपी या संस्थेच्या रिपोर्टचा आधार घेऊन गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिल्लीत आधीच याप्रकरणावर भाष्य केले होते. नंतर आता त्यांनी मुंबईतही पत्रकार परिषद घेऊन अदानी समुहावर आणि सरकारवर आरोप लावले.
राहुल गांधी सध्या मुंबईत विरोधी आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले आहेत. पण सर्व नेते बैठकीमध्ये व्यस्त असताना राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आहे. अदानींच्या आडून त्यांनी केंद्र सरकारवरही निशाना साधला. याआधी हिंडनबर्ग या संस्थेने एक रिपोर्ट सादर करत अदानी समुहावर गंभीर आरोप केले होते.
हिंडनबर्गच्या या आरोपात प्राथमिक तपासात कोणतेही तथ्य समोर आले नाही. तरीही त्यावेळी विरोधकांनी अदानी समुहाला निशाना बनवले होते. आता विरोधक आणि राहुल गांधी अदानी समुहावर टीका करत आहेत. याप्रकरणी शेयर बाजाराची नियमन करणारी संस्था 'सेबी' आधीच तपास करत आहे. या तपासात लवकरच सत्य बाहेर येईल.