ऑस्कर विजेत्या बेल्ली ठरल्या थेप्पाकडू हत्ती कॅम्पमधील पहिल्या महिला कावडी

    03-Aug-2023
Total Views |
 
bellie
 
तामिळनाडू : तामिळनाडू सरकारने व्ही बेल्लीच्या अनाथ हत्तींच्या बछड्यांचे यशस्वीपणे संगोपन करण्यासाठी समर्पित सेवेबद्दल त्यांची थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये पहिली महिला कावडी (माहूतची सहाय्यक) म्हणून नियुक्ती केली आहे. यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या ‘द एलिफंट व्हीस्परर्स’ हा लघूपट व्ही बेल्ली यांच्यावर आधारित होता.
 
बेल्ली आणि त्यांचे पती बोमन यांनी मार्चमध्ये हा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. बेल्ली यांच्या या क्षेत्रातील कार्याची दखल घेत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्य सचिवालयात बेल्ली आणि त्यांचे पती बोमन यांच्या उपस्थितीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
 
तमिळनाडूतील मृदुमलाई जंगलात थेप्पाकडू हा एलिफंट कँप आहे. याठिकाणी 28 हत्ती आहेत. बोमन आणि बेल्ली या जोडप्याने या हत्तींचा सांभाळ केला. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. निलगिरी जिल्ह्यातील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प हे आशियातील सर्वात जुन्या हत्तींच्या छावण्यांपैकी एक आहे.
 
प्रत्येक हत्तीची काळजी एक माहूत आणि एक कावडी घेतात, जे स्थानिक आदिवासी आहेत. येथील हत्तींच्या आरोग्यासाठी त्यांच्याकडून वैयक्तिक काळजी आणि लक्ष देणे महत्त्वाचे असते