ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील १० खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रातील मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले, ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे की,येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले असून आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हाधिकाऱ्यांनी काढले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील १० शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रिडापटुंचा नुकताच राज्यस्तरीय सत्कार पुण्यात झाला. त्याचे औचित्य साधुन तसेच पालकत्व म्हणुन घरच्या लोकांकडुन सत्कार समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी शिनगारे यांनी यावर्षी १० खेळाडूंचे सत्कार करण्याचे भाग्य लाभले मात्र पुढील वर्षी २० खेळाडूंचे सत्कार करण्याचे भाग्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
सन्मानित मार्गदर्शक व खेळाडूंची नावे-
सन २०१९-२०- जीवनगौरव पुरस्कार- बॅडमिंटन- श्रीकांत शरदचंद्र वाड
सन २०१९-२०- क्रीडा मार्गदर्शक- कबड्डी- प्रशांत परशुराम चव्हाण
सन २०१९-२०-पॉवर लिफ्टिंग- नाजूका तातू घारे, शुटिंग- भक्ती भास्कर खामकर, कबड्डी- श्रीमती सायली उदय जाधव (सध्या तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत)
सन २०२०-२१- कबड्डी- निलेश तानाजी साळुंके, खो-खो- प्रियांका पंढरी भोपी, टेबल टेनिस- सिद्धेश मुकुंद पांडे,
सन २०२१-२२- पॉवर लिफ्टिंग- साहिल मंगेश उतेकर,
मैदानी खेळ- प्रणव प्रशांत देसाई