जपानची टेक्निक मुंबईत वापरणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    28-Aug-2023
Total Views |

Devendra Fadanvis


मुंबई :
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना साचणाऱ्या पाण्याचा आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परंतू, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साचणाऱ्या पाण्यावर उपाय शोधला असल्याचे सांगितले आहे. यामुळे  मुंबईकरांना अतिवृष्टीचा त्रास सहन करावा लागणार नाही. 
 
जपानच्या टोकियो शहरात अतिवृष्टीमुळे साचलेले पाणी भूगर्भात साठवण्याची व्यवस्था आहे. टोकियो शहरातील या व्यवस्थेमुळे तेथे पाणी तुंबत नाही. आता जपान सरकारच्या मदतीने अशीच व्यवस्था मुंबईत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
 
या व्यवस्थेमुळे आगामी काळात अतिवृष्टी झाल्यास मुंबई डुबली किंवा बुडली असे चित्र दिसणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसीय जपान दौरा करुन मायदेशी परतले आहेत. यादरम्यान त्यांनी विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत महाराष्ट्र त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.