नवी दिल्ली : चॅट जीटीपीसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चॅटबॉट्सचे प्रतिसाद कायदेशीर किंवा तथ्यात्मक मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी आधार तयार करू शकत नाहीत, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह म्हणाल्या की, चॅटजीपीटी न्यायिक प्रक्रियेत मानवी बुद्धिमत्तेची किंवा मानवी घटकांची जागा घेऊ शकत नाही. चॅटजीपीटी हे एक असे साधन आहे, जे केवळ प्राथमिक संशोधनासाठी वापरले जाऊ शकते. एआयद्वारे व्युत्पन्न केलेल्या डेटाची अचूकता आणि विश्वासार्हता अद्याप अतिशय प्राथमिक पातळीवर आहे, याकडेही न्या. सिंह यांनी लक्ष वेधले.
फ्रेंच फुटवेअर आणि अॅक्सेसरीज कंपनी ख्रिश्चन लुबाउटिनने दाखल केलेल्या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली आहेत.