नागपुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला बळ द्या: उद्धव ठाकरे
25-Aug-2023
Total Views |
मुंबई : नागपुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला बळ द्या, असं उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावरुन, उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचासरणीचा विसर पडलेला पुन्हा एकदा दिसत आहे. बाळासाहेब म्हणाले होते, "मी माझं दुकान बंद करेन पण, काँग्रेससोबत कधीच जाणार नाही." मात्र ठाकरेंनी .याउलटचं केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मतदार संघात जाऊन काँग्रेसला बळ द्या. असं विधान त्यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बारामती प्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षाला मदत करण्याची तयारी ठेवा, अशा सूचना दिल्या आहेत. ठाकरे पक्षाकडून राज्यातील ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. या आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी रामटेक आणि नागपूर विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे.
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या जागेवर मित्रपक्षाला ताकद देण्याचं आवाहन केलं. तर, रामटेक मतदारसंघात आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नागपूर लोकसभा मतदारसंघात मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला बळ देण्याची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पक्ष उमेदवार देईल तर नागपूर लोकसभा मतदारसंघात आपल्याला मित्र पक्षाला बळ द्यावा लागेल, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.