
सनीपाजींच्या थकबाकीसाठी अक्षय कुमार सरसावले?
मुंबई : मुंबई रविवारी लोन डिफॉल्टर म्हणून अभिनेते व खासदार सनी देओल यांच्या जुहूतील बंगल्यात जप्तीची नोटीस बँक ऑफ बडोदाने बजावली होती. ५६ कोटींचे थकीत कर्ज न चुकवल्याने ही कारवाई बँक करणार होती परंतु अचानक 'तांत्रिक 'अडचणींमुळे ही नोटीस मागे घेत असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. कर्जापैकी ५५.९९ कोटी रुपये थकीत असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाली होती. या कर्जासाठी अजय सिंह देओल उर्फ सनी देओल यांच्या कर्जासाठी स्वतः वडील धर्मेंद्र देओल हे हमीदार होते. सनी विला या बंगल्यासोबत सनी साऊंडस ही कंपनी देओल परिवाराची आहे.
याविषयी अद्याप सनी देओल यांच्याकडून कुठलेही वक्तव्य आलेले नाही. परंतु फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या बातमीनुसार अक्षय कुमार सनी देओल यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. थकित कर्जापैकी ३० ते ४० कोटी रुपयांचे सहाय्य अक्षय कुमार करणार आहेत.वेळेवर पैसे चुकवण्यासाठी ही मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच सनी देओल यांचा गदर २ व अक्षय कुमार यांचा ओ माय गॉड २ एकाचवेळी प्रदर्शित झाले आहेत.
बँक ऑफ बडोदा कडून यासंदर्भात अधिक माहिती प्राप्त झाली नाही.