FIFA Women's World Cup 2023 Final: इंग्लंडला हरवत स्पेनने रचला इतिहास
20-Aug-2023
Total Views |
नवी दिल्ली : फिफा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने बलाढ्य इंग्लंडचा पराभव करत विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच स्पेनच्या महिला संघाने ही कामगिरी बजावली आहे. दरम्यान, स्पेनच्या महिला संघाने इंग्लंडचा १-० असा पराभव करून फिफा महिला विश्वचषक २०२३ विजेतेपद पटकावले आहे. विशेषतः दोन्ही संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
दरम्यान, स्पेनच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ओल्गा कार्मोनाने विजयी गोल करत संघाला विजय मिळवून दिला. तिने खेळाच्या २९व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलमुळे स्पेनचा संघ प्रथमच विश्वविजेता ठरला आहे. परिणामी, दुसरीकडे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याचे इंग्लंडचे स्वप्न भंगले.
विश्चचषकाच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघाकडून उत्तम खेळ करण्यात आला. यावेळी स्पेनच्या संघाने मिडफिल्डवर अधिक नियंत्रण राखले त्यामुळे प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाला गोल करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. तसेच, स्पेनच्या संघाला पेनल्टीची संधी मिळाली होती परंतु, स्ट्रायकर जेनिफर हर्मोसोने पेनल्टी चुकवली नसती तर इंग्लंडचे पराभवाचे अंतर दुप्पट झाले असते.