ब्लॉक फिचरला 'एक्स' चा रामराम !

युजर्सला मस्क यांच्याकडून अनपेक्षित धक्का?

    19-Aug-2023
Total Views |
Elon Musk
 
 
 
ब्लॉक फिचरला 'एक्स' चा रामराम !
 
 
 

युजर्सला मस्क यांच्याकडून अनपेक्षित धक्का? 
 
 

नवी दिल्ली :  रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार X (पूर्वीचे ट्विटर)चे संस्थापक एलोन मस्क यांनी ब्लॉक फिचर रद्दबादल करण्याचे ठरवले असल्याचे सांगितले.  या फिचरप्रमाणे युजर आता दुसऱ्या खात्यांना ब्लॉक करू शकणार नाहीत.  अर्थात यात ते विशिष्ट युजर तुम्हाला डायरेक्ट इनबॉक्स मेसेज पाठवू शकले नसले तरी त्यांचा पोस्ट व कमेंट डिलिट करता येणार नाहीत.  नवीन फिचर प्रमाणे नको असलेल्या युजर्सला ग्राहक म्युट करू शकतील परंतु त्या संबंधित व्यक्तीला आपल्या ट्विट,कमेंट दिसतील त्या आपण मात्र लपवू शकणार नाही. युजर्सने जर तुमच्या एखाद्या पोस्टवर कमेंट केली तर ती तुम्हाला दिसेल असे बदल एक्स मध्ये करण्यात आल्याचे समजत आहे.
 
 
एलोन मस्क हे अभिव्यक्ती  स्वातंत्र्याच्या पक्षात राहिले असले तरी मानसिक त्रास देणाऱ्या, भावना भडकवलेल्या पोस्ट,आक्षेपार्ह मजकूर यावर फारसे एक्स (ट्विटर)ला गांभीर्य नसल्याचा आरोप मात्र सोशल मीडिया तज्ञांनी केला आहे.  या बदलत्या नियमावलीमुळे अँपचे पुढील धोरण काय असेल याची उत्सुकता कायम आहे.  त्यामुळे या निर्णयामुळे मत मतांतर असल्याचे दिसून आले.
 
 
कंपनीने हा निर्णय का घेतला याबाबत एक्सकडून खुलासा अजून आलेला नाही.