सार्वजनिक उद्योगातील बँका, खासगी बँका तसेच मोठ्या सहकारी बँका बिगरबँकिंग वित्तीय संस्था यांच्याकडून शेअर तारणावर सहज, पण नियमांनी कर्ज मिळू शकते. हे कर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने घेता येते. यासाठी संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेच्या विहित नमुन्यातील फॉर्म योग्यरित्या भरुन ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसा हवा त्या पद्धतीने सबमिट करावा लागतो. सोबत शेअरचे ‘डी-मॅट’ खात्याचे स्टेटमेंट जोडावे किंवा अपलोड करावे लागते.
कोणाला काहीही कारणासाठी पैशाची गरज निर्माण होऊ शकते व हा पैसा उभारण्यासाठी जर कर्ज घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसेल, तर अधिक दराचे वैयक्तिक कर्ज घेण्यापेक्षा जर कुठे गुंतवणूक केलेली असेल, तर त्या गुंतवणुकीवर कर्ज घेणे चांगले. गेल्या काही काळात शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः तरुण पिढीचा याकडे अधिक ओढा असल्याचा दिसून येतो. पैशाची गरज पडल्यास हे शेअर तारण ठेवून कर्ज घेता येते. शेअर विकावे लागत नाही. पोस्टातील ठेवींत गुंतवणूक, बँकांच्या ठेवींत गुंतवणूक, बँकांच्या ठेवींत गुंतवणूक, जीवन विमा पॉलिसी सरकारी व अन्य कर्जरोखे या गुंतवणुकींवरही कर्ज मिळू शकते. आर्थिक गरजेच्या वेळी शेअर बाजारभावाने विकता येतात. पण, काही कालावधीची गरज भागविण्यासाठी आपल्याकडे असलेल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर विकले, तर पुन्हा ते घेणे जमलेले असे नाही म्हणून शेअर न विकता तारण ठेवून त्यावर कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते.
सार्वजनिक उद्योगातील बँका, खासगी बँका तसेच मोठ्या सहकारी बँका बिगरबँकिंग वित्तीय संस्था यांच्याकडून शेअर तारणावर सहज, पण नियमांनी कर्ज मिळू शकते. हे कर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने घेता येते. यासाठी संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेच्या विहित नमुन्यातील फॉर्म योग्यरित्या भरुन ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसा हवा त्या पद्धतीने सबमिट करावा लागतो. सोबत शेअरचे ‘डी-मॅट’ खात्याचे स्टेटमेंट जोडावे किंवा अपलोड करावे लागते. तसेच, केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.‘डी-मट’ खात्यावर असलेल्या शेअरच्या बाजारीमूल्याच्या ५० टक्के मात्र कमाल २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करुन घेऊन तुम्हाला हवी तशी वापरू शकता किंवा एकरकमी सर्व रक्कम वापरू शकता.कर्जाची परतफेड जास्तीत जास्त तीन वर्षांत दर महिन्यास हप्ता भरुन करावी लागते. या कर्जावर दरसाल दरशेकडा १० ते १२ टक्के दराने व्याज द्यावे लागते. कर्जाची रक्कम कोणत्या कारणासाठी वापरावी याबाबत काही बंधने नाहीत.
कर्ज रक्कम ‘आयपीओ’तगुंतवणूक करण्यासाठी हवी असल्यास, यात कमाल दहा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. कर्जदाराच्या ‘डी- मॅट’ खात्यात असणार्या कोणत्या शेअरवर कर्ज मंजूर करावयाचे याचा अधिकार कर्ज देऊ करणार्या बँकेत असतो. जे शेअर कर्ज मंजूर करण्यासाठी तारण आहेत, ते शेअर कर्ज देणार्या यंत्रणेला प्लेज (pledge) करण्यास सांगितले जाते. कर्ज घेतल्यानंतर ‘डी-मॅट’ खात्यात तारण ठेवलेल्या शेअर व प्लेज व तारण नसलेल्या शेअरवर ‘बेनिफिशियरी’ असे त्यांचे वर्गीकरण केले जाते. तारण म्हणून दिलेल्या शेअरची बाजार मूल्यानुसार ‘ड्रॉईंग पॉवर’ काढली जाते. कर्ज नेहमी ‘ड्राईंग पॉवर’ रकमेच्या आत असणे आवश्यक असते.
उदाहरणच द्यायचे तर रु. ४० लाख रुपये बाजारभाव असणार्या शेअरवर २० लाख रुपयांचे कर्ज संमत झाले असेल आणि नंतर शेअर बाजार घसरल्यामुळे शेअरचे बाजारी मूल्य ३५ लाख रुपये झाले म्हणजे कर्जदाराची ’ड्रॉईंग पॉवर‘ रुपये १७ लाख, ५० हजार झाले व त्याने रुपये १९ लाख, १० हजार रुपये कर्ज वापरले आहे, तर मर्यादेपलीकडे त्याच्या खात्यात १ लाख, ६० हजार रुपये रक्कम आहे. असे खाते नियमित करण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक कर्जदाराने याच्या ‘डी-मॅट’ खात्यातील उर्वरित म्हणजे ‘बेनिफिशियरी’ वर्गीकरण असलेले शेअर किमान दोन ते अडीच लाख रुपये बाजारभाव असणारे वाढीव तारण म्हणून ‘प्लेज’ करावेत. जर हा पर्याय शक्य नसेल, तर ‘ड्रॉईंग पॉवर’च्या रकमेहून अधिक रक्कम भरुन खाते नियमित करावे. जर खातेदाराने कर्जदाराने आपले खाते ‘ड्रॉईंग पॉवर’मध्ये आणले नाही, तर बँक ‘प्लेज’ असलेले शेअर बाजारभावाने विकून खाते नियमित करू शकते किंवा सर्व शेअर विकून बंद करू शकते. कर्जाच्या कालावधीत संबंधित शेअरवर मिळणारे बोनस, लाभांश कर्जदाराला मिळतात. कर्जाची रक्कम हातात पडण्यापूर्वी कर्जदाराला कर्जाच्या रकमेची प्रॉमिसरी नोट आणि प्लेज अॅग्रिमेंट करुन द्यावे लागते.
हे कर्ज अगदी सहजगत्या मिळू शकते व अन्य कर्जांच्या तुलनेत व्याजदर कमी असतो. कर्जास जामीन द्यावा लागत नाही. याशिवाय कर्ज रक्कम आपल्याला हव्या त्या कारणासाठी वापरता येते. ताळेबंद किंवा अन्य आर्थिक माहिती द्यावी लागत नाही. ओव्हरड्राफ्ट पद्धतीने कर्ज घेतल्यास शेअरची बाजारातील किंमत वाढल्यास कर्जमर्यादा वाढवून मिळू शकते. शेअर न विकता कर्ज घेतल्याने शेअरवर मिळणारा लाभांश/बोनस/राईट अबाधित राहतात. तसेच, शेअरचे भाव वाढल्यास भांडवली नफाही होत असता असे कर्ज इकिक्वटी म्युच्युअल फंडाच्या युनिट्सच्या तारणावर मिळू शकते.शेअर असणार्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीच्या वेळी त्यावर सहजगत्या कर्ज मिळू शकते. शेअर तारण कर्ज आता बहुतेक सर्व बँका ऑनलाईन देतात. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता घरबसल्याही कर्ज मिळू शकते. शेअर विकण्यापेक्षा कर्ज घेणेचांगले, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. बँकेत मान्य असतील अशा कंपन्यांच्या शेअर्सवरच कर्ज मिळते. शेअर बाजारात ‘ए ग्रुप’मध्ये समाविष्ट असलेल्या बहुतेक कंपन्यांच्या शेअरवर कर्ज मिळते. प्रत्येक बँकेचा या कर्जावरील व्याजदर वेगवेगळे आहेत. त्यामुळे कमी व्याज आकारण्याच्या बँकेकडून कर्ज घ्यावे.