नवी दिल्ली : अटलजींनी आपले अवघे आयुष्य राष्ट्राप्रती समर्पित होते. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांन सदैव राष्ट्रवादालाच सर्वोच्च प्राधान्य दिले, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितन गडकरी यांनी केले. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे त्यांना ‘अभिमानमूर्ती सन्मान’ प्रदान करण्यात आला. यावेळी वाजपेयी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य आणि त्यांची पती रंजन भट्टाचार्य यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि नृपेंद्र मिश्रादेखील उपस्थित होते.
अटलजी हे प्रत्येकाच्या श्वासाश्वासात आजही जीवंत आहेत. त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व हे कधीही विसरता येण्यासारखे नाही. ते सद्ह्रदय होते, सौजन्यमूर्ती होते आणि अतिशय संवेदनशील होते. समोरच्या व्यक्तीचा सन्मान ठेवून ते संवाद साधत असत. ते निष्णात विदेशनितीतज्ज्ञ होते, लोकशाही मुल्यांवर त्यांची अजोड श्रद्धा होती. त्यामुळेच अवघ्या एका मताने त्यांचे सरकार पडल्यानंतरचे त्यांचे भाषण हे लोकशाही मूल्यांचा गौरव करणारेच होते. त्यामुळे अटलजी देशवासियांच्या सदैव स्मरणा राहतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
अटलजी हे अजातशत्रू राजनेता असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, काँग्रेससह अन्य सर्व विरोधी पक्षांचे नेते अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी आवर्जून येत असत. अटलजी एकदा ग्वाल्हेर मतदारसंघातून माधवराव सिंदिया यांच्याविरोधात पराभूत झाले होते. त्यावेळी माधवरावांच्या आई म्हणजेच राजमाता विजयाराजे सिंदिया यांना अटलजींच्या पराभवाचे वाईट वाटले. त्यांच्याकडे मानणे जोडण्याची कला होती. “आयुष्य किती वर्षे जगलो हे महत्त्वाचे नसून ते कसे जगलो हे महत्त्वाचे आहे” लोकमान्य टिळक म्हणत असत. अटलजींच्या आयुष्याचेही तसेच होते. त्यामुळे संघ स्वयंसेवक, जनसंघ नेता, देशाचे परराष्ट्र मंत्री आणि अखेरिस देशाचे पंतप्रधान अशा सर्व पदांवर असताना त्यांनी राष्ट्रसेवेचाच विचार केला, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी नमूद केले आहे.