केरळमधील 'पीएफआय'च्या ठिकाणांवर 'एनआयए'ची छापेमारी; कोट्यवधींची मालमत्ता जप्त

    13-Aug-2023
Total Views |
nia-raids-in-PFI-various-places-in-kerala

नवी दिल्ली :
पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एनआयएने केरळमधील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यास सुरुवात केली. यात कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये पीएफआय या दहशतवादी संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली होती. तसेच, या दहशतवादी संघटनेतील बहुतेक नेत्यांना तुरुंगवासात टाकण्यात आले होते. याशिवाय, ईडीने दि. ०५ जुलै २०२३ रोजी ची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली होती. त्यात २.५३ कोटींची स्थावर मालमत्ता होती. तसेच, या संलग्न मालमत्तांमध्ये ३३८.०३ चौरस मीटरचे चार व्हिलादेखील समाविष्ट आहेत.

दरम्यान, देशभरातील पीएफआयच्या ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेची करडी नजर असून छापेमारीची धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. केरळमधील पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएने दि. १३ ऑगस्ट रोजी पहाटेपासूनच कारवाई करण्यास सुरुवात केली असून मलप्पुरम येथे बंदी घातलेल्या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या सदस्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले.

दरम्यान, पीएफआयवर देशभरातील अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप असून शिवाय, ते २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या दिशेने काम करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळमधील प्रतिबंधित इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या माजी कार्यकर्त्यांच्या चार निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले आहेत. यात कोडापरंबा, कन्नूर शहर आणि कन्नूरमधील पल्लीराम येथील तीन घरांची झडती घेण्यात आली असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या टीमने रविवार, दि. १३ ऑगस्ट रोजी पहाटे ०४:30 वाजता केलेली छापेमारी सकाळी ०९:३० वाजेपर्यंत म्हणजेच ५ तास चालली.