मुंबई : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेदरम्यानच इंग्लंड क्रिकेट संघाला अचानक धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना असेल. तसेच, तो यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही खेळणार नसल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, ३७ वर्षीय ब्रॉडने २००६ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्यांची कारकीर्द जवळपास १७ वर्षांची होती. या १७ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने कसोटीत ६०० हून अधिक बळी घेतले आहेत. तसेच, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत ६०२ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. तसेच, इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसोबत ब्रॉडने १३८ सामन्यात हजारांहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.