"बायोपिक म्हणजे नक्कल व्हायला नको...", बाबूजी साकारताना सुनील बर्वे 'ही' काळजी घेणार

    28-Jul-2023
Total Views |

sunil barve





मुंबई :
लहानपणापासून ज्यांच्या गाण्यांचे संस्कार आपल्या पिढीवर झाले ते सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सुधीर फडके अर्थात सगळ्यांचे लाडके बाबूजी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे करणार आहेत. तर अभिनेता सुनील बर्वे यात बाबूजींची भूमिका साकारणार आहे. ज्यावेळी बाबूजींची भूमिका मला साकारायची आहे हे समजलं अगदी त्या क्षणापासून मी त्यांच्या काळात गेलो आणि माझा त्यांच्याबद्दलचा अभ्यास सुरु झाला, असे सुनील बर्वे याने म्हटले.
 
'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चरित्रपटातून गाण्यापलीकडचे बाबूजी कसे होते आणि त्यांचे जीवन कसे होते हे दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुनीलने सांगितले. बाबूजी साकारताना त्यांच्याबद्दल अभ्यास करण्यास सुरुलात केली. त्यासाठी त्यांचे गातानाचे व्हिडिओ पाहिले. श्रीधर फडके यांच्यासोबत आम्ही वर्कशॉप केलं अशी माहितीही सुनीलने दिली. तसेच, त्यांच्या काही मुलाखती देखील पाहिल्याचे त्याने म्हटले. इतकंच नाही तर त्यांचे हातवारे कसे असायचे, ते बोलताना कधीच त्यांची मान वर नसायची तर या बारीक गोष्टींचा अभ्यास माझा सुरु झाला आणि तो पुढे सुरुच राहील अशी कबूली सुनीलने यावेळी दिली.
 
महत्वाचं म्हणजे बायोपिक कोणत्याही कलाकाराला करणं फार आव्हानात्मक असतं. याचं कारण सांगताना सुनील म्हणाला, ठतुम्हाला ती व्यक्तिरेखा तर साकारायची आहेच, पण जर का जास्त केलं तर ती नक्कल वाटू शकते आणि ती नक्कल वाटू नये म्हणून त्या चरित्राच्या किंवा त्या व्यक्तिरेखेच्या जवळपास जाण्याचा प्रय्तन प्रत्येक कलाकाराने करावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून मी देखील करेन", असे सुनीलने म्हटले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.