फिल्मसिटीत पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री

    27-Jul-2023
Total Views |
 

leopard (1)
 
 
 
मुंबई : मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रपनगरीत पुन्हा एकदा बिबटे दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी एका हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या शिरला होता. ही घटना ताजी असताना आता एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याची बातमी समोर आली. बिबट्या आल्याचे समजल्यानंतर सेटवर गोंधळ उडाला होता. दरम्यान, बिबट्या येण्याच्या घटना वारंवार घडू लागल्यामुळे आता सरकारने देखील ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे असे आवाहन भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनकडून करण्यात आले आहे.
 
 
 
अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनने बिबट्याचा व्हिडीओ शेअर करत असे म्हटले की, "सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. हा अनेकांच्या जीवाचा प्रश्न आहे." तसेच, गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी किंवा चौथी वेळ आहे. बिबट्याने सेटवर प्रवेश केला तेव्हा तेथे २०० हून अधिक लोकं उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच माझी तुझी रेशीमगाठ फेम बालकलाकार मायरा वायकुळची नवी हिंदी मालिका निरजाच्या सेटवरही बिबट्या घुसला होता.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.