RRR चित्रपटाचा सिक्वेल येणार? राजामौली म्हणाले...

    27-Jul-2023
Total Views |

RRR movie
 
 

मुंबई :
सध्या मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांना दाक्षिणात्य चित्रपटांची अधिक ओढ लागलेली दिसून येते. २०२२ मधील 'आरआरआर' या चित्रपटाचे नाव अग्रस्थानी येते. त्यामुळे या चित्रपटाचा पुढचा भाग येणार का अशी विचारला प्रेक्षकांकडून केली जात असता आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडिल आणि चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी संकेत दिले आहेत की आफ्रिकेत दोन नायकांसह सिक्वेल केला जाऊ शकतो.
 
विजयेंद्र प्रसाद यांना 'आरआरआर'च्या सिक्वेलबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले, “हो आणि नाही दोन्ही आहे. २०२२ मध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर, त्यांनी आपल्या मुलासोबत राजामौलींसमोर या चित्रपटाच्या सिक्वेलची कल्पना मांडली होती, ज्याची कथा आफ्रिकेत सुरू आहे. तसेच, "आरआरआर च्या प्रदर्शनानंतर, मी सीता रामा राजू (राम चरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) यांच्यासोबत आफ्रिकेमध्ये एका सिक्वेलची कल्पना शेअर केली होती." त्यांनी असेही म्हटले की दिग्दर्शक एसएस राजामौली यांना त्यांची कल्पना आवडली आणि त्यांनी ती पूर्ण स्क्रिप्टमध्ये विकसित करण्यास सांगितले आहे.
 
राजामौली चित्रिकरणात आहेत व्यस्त
 
एसएस राजामौली सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत, ज्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू दिसणार आहेत. हा चित्रपट संपल्यावरच ते पुढील प्रोजेक्टचा विचार करू शकतील. विजयेंद्र प्रसाद म्हणाले, 'मी माझ्या मुलाला ओळखतो, त्यामुळे महेशसोबतचा त्याचा चित्रपट पूर्ण होईपर्यंत तो सिक्वेलचा विचार करणार नाही. त्यानंतर जर त्यांना स्क्रिप्ट आवडली, दोन्ही नायकांना स्क्रिप्ट आवडली आणि त्यांच्याकडे वेळ असेल तर...' यापूर्वी विजयेंद्र यांनी महा न्यूजला सांगितले होते की, कोणताही हॉलिवूड दिग्दर्शक आरआरआरचा सिक्वेल दिग्दर्शित करू शकतो.
 
काय म्हणाले होते राजामौली?
 
एसएस राजामौली यांनी नोव्हेंबरमध्ये शिकागोमध्ये 'आरआरआर' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान सांगितले होते की, मला या चित्रपटाचा सिक्वेल करायला आवडेल. त्यांनी असेही सांगितले होते की ते याबाबत अधिक तपशील सांगू शकत नाहीत, परंतु त्याच्या वडिलांनी कल्पना शेअर केली आहे, ते कथेवर काम करत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.