मराठवाडा, विदर्भ मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस बरसणार!

    19-Jul-2023
Total Views |

heavy rain 
 
 
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावागावातील नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत असून, छोटे-मोठ्या पुलांवरुन पाणी वाहत आहे. गावागावातील नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत असून, छोटे-मोठ्या पुलांवरुन पाणी वाहत आहे. मराठवाडा, विदर्भातही येत्या काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
कल्याण: कल्याण नगर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण नगर मार्गावरील म्हारळ, वरप, कांबा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रायते पुलावर पाणी साचल्याने वाहन चालक, चाकरमान्यांचे हाल होत आहेत. शिवाय, रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरूच आहे.
 
अहमदाबाद: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर वर्सोवा ब्रिज खालील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वर्सोवा ब्रिज खाली ठाण्याकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गिकेवर मोठमोठे खड्डे आणि त्यात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अहमदाबादहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. वर्सोवा ब्रिज ते काश्मीरापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
  
बदलापूर: पूर परिस्थिती
 
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे.
 
रायगड: रायगडमध्ये पुराचा धोका वाढला आहे. महाड, पोलादपुर, माणगाव, सुधागड, रसायनीमध्ये सखल भागात पुराचे पाणी साचले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. प्रशासन अलर्ट मोडमध्ये असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाडमध्ये बाजार पेठेत पुराचे पाणी शिरले आहे.
 
भिवंडी: भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळ पासून पावसाला सुरवात झाली आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. भाजी मार्केट भागात गुडघाभर साचले पाणी असून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पाण्यातून वाट काढत रस्ते पार करावे लागत आहे.