मुंबई : अतिमुसळधार पावसामुळे ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे थांबल्याने एक दाम्पत्य आपल्या चार महिन्याच्या बाळासह रेल्वे ट्रॅकवर चालत होते. यावेळी अचानक त्यांचे चार महिन्याचे बाळ हातातून निसटले आणि त्या वाहत्या पाण्यात पडले. ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान २ तास उभा होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यात एका लहान बाळाला घेऊन त्या बाळाची आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटून पाण्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत बाळ वाहून गेल्याची ही दुर्देवी घटना घडलीय.