सुनील शेट्टी बाजारू कलावंत! जागतिक भिकारी : सदाभाऊ खोत
14-Jul-2023
Total Views |
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने केलेल्या ट्विटवर आता रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, सुनील शेट्टीने टोमॅटो दरावाढीसंदर्भात एक ट्विट केले होते. त्यावर सदाभाऊ खोत यांनी चांगलीच टीका केली. ते म्हणाले, सुनील शेट्टी हा सिनेकलावंत नसून बाजारू कलावंत असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच, असल्या सडक्या डोक्याच्या व्यक्तीच्या कटोरीत सडके टोमॅटो टाका असे आवाहनही त्यांनी शेतकरी बांधवांना केले.
दरम्यान, सुनील शेट्टीने टोमॅटो दरवाढीसंदर्भात केलेले ट्विट हे राज्यातील शेतकऱ्यांचा अपमान असून त्यांना टोमॅटो दरवाढ पाहवत नसेल तर काय म्हणावे. तसेच, कोट्यवधींचे मानधन घेणाऱ्या सिनेकलावंताला १३० रुपयांचा टोमॅटो विकत घेता येत नसेल तर तुम्ही जागतिक भिकारी आहात. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या भाववाढ मिळत नसल्यामुळे होतात. आता जर त्यांना चांगला भाव मिळत असेल तर त्याचा तुम्ही विचार करत नाही असेही ते म्हणाले.