पावसाळ्यात गोव्याचा प्लान करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

    12-Jul-2023
Total Views |
Goa local administration Banned Waterfall To Tourist

मुंबई
: पश्चिम किनारपट्टीभागात पावसाचा जोर वाढत असतानाच राज्यातून पर्यटक विविध ठिकाणांना भेट देत असतात. पावसाळी सहली काढण्याचा हा काळ असल्याने पर्यटकांना तिकडे ओढा दिसून येत असतो. दरम्यान, गोव्यातील पर्यटनस्थळे पावसाळी सहली काढण्यासाठी पहिली पसंती ठरतो. त्यातच आता गोव्यातील प्रमुख धबधब्यांवर जाण्यास तेथील प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. गोव्यात काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडताना दिसून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये ४० लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाले आहेत. त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक लोक हे गोव्यातील स्थानिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, पोहताना काळजी न घेणे, पोहायला येत नसतानाही पाण्यात उतरणे, सेल्फी काढण्यात नादात तोल जाऊन पडणे, तसेच सुरक्षा यंत्रणा नसणे ही यामागची कारणे असल्याचे बोलले जात आहे.