मुंबई : कणकवली येथील रसिकांसाठी एक आकर्षक सभासद योजना निलायम द ब्लू बॉक्स या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली आहे. १०० रसिकांसाठी बैठक व्यवस्था असलेलं हे मिनी नाट्यगृह ऑकटोबर २०२२ मध्ये सुरु करण्यात आले. प्रत्येक महिन्याला १ याप्रमाणे वर्षाला १२ किंवा अधिक कार्यक्रम या नाट्यगृहात होत असतात. या कार्यक्रमांकरिता वार्षिक वर्गणीची योजना देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमांना उजाळा देण्यासाठी दर वर्षी १२ म्हणजे महीन्याला प्रत्येकी १ याप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले जातील. यात नाटके, चित्रपट, संगीताचे कार्यक्रम, कथाकथन, पुस्तकवाचनाचे कार्यक्रम, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांचा भरणा असणार आहे. या योजनेत कुटुंबातील दोन सदस्यांनी लाभ घ्यायचे ठरवल्यास सवलत मूल्यही ठरवले आहे. एका व्यक्तीसाठी वार्षिक वर्गणी २५०० इतकी असेल तर एकाच कुटुंबातील दोघांसाठी वर्गणी ४ हजार रुपये इतकी असेल. अधिक माहितीसाठी वामन पंडित आणि जोती पंडित यांच्याशी संपर्क करावा. ९४२२०५४७४४ आणि ९४२३८८४१८४ या क्रमांकावर संपर्क करावा.