मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकऱणी AIMIMच्या शहराध्यक्षाला अटक!

    08-Jun-2023
Total Views |
uttar-pradesh-meerut-umar-torture-muslim-girl-police-arrested
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मेरठ असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM चा शहराध्यक्ष असल्याची बतावणी करून एका तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपी उमैरला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ५ जून २०२३ रोजी लालकुर्ती पंथ बाजारपेठेतील आहे. त्याचा व्हिडिओही ७ जून रोजी व्हायरल झाला आहे.

AIMIM चा शहराध्यक्ष उमैर हिजाब घातलेल्या मुस्लिम मुलीवर अत्याचार करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो तिला म्हणतो, “तुझं नाव सांग. तुम्ही मुस्लिम नाही. तुमचे आधार कार्ड दाखवा. आणि जर तु मुस्लिम आहेस तर हिंदू मुलासोबत का फिरत आहेस" , असा सवाल ही उमैरने उपस्थित केला.

या प्रकऱणावर एसपी सिटी पीयूष कुमार सिंह यांनी सांगितले की, व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी उमैरला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.लालकुर्ती पंथ मार्केटमध्ये एक मुस्लिम मुलगी एका हिंदू मुलासोबत फिरत होती तेव्हा जमावाने दोघांनाही चारही बाजूंनी घेरले. काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला व्हिडिओमध्ये दिसणारा लांब केसांचा माणूस उमैर आहे. तो तरुणीला वारंवार हिंदू तरुणांसोबत बाहेर फिरण्याबद्दल प्रश्न विचारत होता.

उमैर वारंवार तरुणीला तिचा ओळखपत्र विचारत होता. यासोबतच तो त्या मुलीला शिवीगाळ ही करत होता. त्यामुळे मुलगी रडताना व्हिडीओत दिसत आहे. मात्र तिथल्या गर्दीला त्याचा काही फरक पडलेला दिसत नाही. उलट तेथील लोक व्हिडीओ बनवण्यात व्यस्थ आहेत.
 
या वर्षाच्या सुरुवातीला मेरठमध्येही असाच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये मुस्लिम त्यांच्याच धर्माच्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होते. यूपी पोलिसांनी या घटनेची दखल घेतली होती. दोन्ही मुस्लीम मुली एका हिंदू तरुणासोबत फिरत होत्या, यावर कट्टरपंथी संतापले आणि त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याला जबरदस्तीने तोंड दाखविण्यास भाग पाडले.