अमरावती :गुरुबार दि.८ जून : तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथे मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेतकऱ्यांच्या मशागत,पेरणी पूर्व तयारीचा शेतात जावून त्यांनी आढावा घेतला.यावेळेस तिथे उपस्थित शेतकरी किरण फरतोडे यांचा स्वतः ट्रॅक्टर चालवत त्यांनी,शेतीची मशागत केली.
.यावर्षी पुरेसा पावूस पडून शेतकरी सुखी समृद्ध व समाधानी व्हावा अशी प्रार्थना त्यांनी निसर्गदेवताकडे केली.शेतकऱ्यांचा काही अडी अडचणी असल्यास केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्याचे निराकरण करण्याचे अभिवचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.