मुंबई : 'थू बाबा थू' कविता लिहित थुंकणाऱ्या राऊतांना शेफाली वैद्यांचे कवितेतून फटकारे दिले आहेत. संजय राऊतांच्या खालच्या पातळीवरील टीकेला सर्वच स्तरावरुन टीकेची झोड उठविली गेली. राजकीय नेत्यांनीदेखील त्यांच्या वकतव्याचा समाचार घेतला. लेखिका शेफाली वैद्य यांनी एक विडंबन कविता पोस्ट केली आहे. त्यांनी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या वकतव्याचा समाचार कवितेच्या माध्यमातून घेतला आहे. त्यांनी एका राजकीय पक्षाचा थूंक टँक म्हणत राऊतांवर एक वात्रटटिका केली आहे. दरम्यान, लेखिका शेफाली वैद्य या राजकीय प्रश्नांवर नेहमीच भाष्य करतात.