जळगाव : एकनाथ खसडेंनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे पण काळे झेंडे दाखवून काय मिळणार आहे. खसडेंचं असं झालंय की त्यांना नवीन मालक मिळाला आहे ते सांगतील तसं खडसेंना वागावं लागतं. असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी खडसे यांच्याकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार होते. त्यावर फडणवीसांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एकनाथ खसडेंनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे, पण काळे झेंडे दाखवून काय मिळणार आहे. खसडेंचं असं झालंय की त्यांना नवीन मालक मिळाला आहे ते सांगतील तसं खडसेंना वागावं लागतं." दरम्यान, पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर विचारले असता फडणवीस म्हणाले, "हे सगळे एकत्र आलेत याचं कारण यांचे घोटाळे बाहेर निघत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत आहे म्हणून ते एकत्रित आलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो असं कुणीही म्हणत नाहीये. कारण भाजप सरकारने देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं केलेली आहेत." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.