नवी दिल्ली : २०२३ चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'द केरला स्टोरी' ला ओटीटीसाठी खरेदीदार मिळत नाही. मात्र याउलट यावर्षी प्रदर्शित झालेले 'भिड' आणि 'अफवाह' सारखे प्रोपगंडा चित्रपट सुपर फ्लॉप होऊनही लगेचच ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. पण अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या 'द केरला स्टोरी'ने जगभरात ३०० कोटींचजी कमाई करून ही ओटीटीवर खरेदीदार मिळत नाही. दरम्यान पश्चिम बंगाल सरकारने तर या चित्रपटावर बंदी घातली होती.
चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवरून योग्य ऑफर आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाची टीम कोणत्याही प्रमुख OTT प्लॅटफॉर्मवरून ते खरेदी करण्यासाठी योग्य ऑफरची वाट पाहत आहे. म्हणून फिल्म इंडस्ट्रीने त्यांना शिक्षा देण्यासाठी एक टोळी तयार केलेली दिसते. कारण, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या यशाने काही लोक नाराज आहेत.
सुदीप्तो सेन म्हणाले की, चित्रपटाला चांगले यश मिळाल्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील काही लोक आमच्याविरुद्ध कट रचत आहेत, असे मला वाटते. द केरला स्टोरी'मध्ये केरळमधील हिंदू मुलींना एका षड्यंत्राखाली कसे टार्गेट करून फसवले जाते आणि त्यांचे धर्मांतर करून लग्न लावून दिले जाते हे दाखवण्यात आले होते. मग त्यांना परदेशात पाठवून ISIS या दहशतवादी संघटनेचे सेक्स स्लेव्ह बनवले जाते.
'द केरला स्टोरी'च्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीबद्दल जाणून घेतला असता, भारतात २४२ कोटी रुपयांचा नेट व्यवसाय केला. तसेच त्याचे देशातील एकूण संकलन २८७ कोटी रुपये होते. परदेशातही १५ कोटींची कमाई केली. एकूणच, त्यांची जगभरातील कमाई ३०० कोटींच्या पुढे गेली आहे. . काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित 'द काश्मीर फाइल्स'ने जगभरात ३५० कोटी रुपये कमवले.तो चित्रपट ZEE5 OTT वर उपलब्ध आहे.