तुम्हाला मी विचारलं की, जगात सर्वात शक्तिशाली देशांची एक यादी बनवा. तर तुमची यादी अनुक्रमे काहीशी अशी असेल. अमेरिका, चीन, भारत, रशिया...वगैरे वगैरे. ही यादी एकाअर्थी बरोबरही आहे. कारण याच देशांकडे शक्तिशाली सैन्य आहे. रशियाला वगळलं तर बाकीचे तीन देश आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. शक्तिशाली सैन्य आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं ही झाली या देशांची 'हार्ड पॉवर'. 'हार्ड पॉवर'प्रमाणेच प्रत्येक देशाकडे 'सॉफ्ट पॉवर' सुद्धा असते. आता तुम्ही म्हणाल ही सॉफ्ट पॉवर म्हणजे नेमकं काय? त्याआधी आपण हार्ड पॉवर म्हणजे काय हे जाणून घेऊ. तर बघा... बलाढ्य सैन्य आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं ही झाली देशांची हार्ड पॉवर.
आता आपण पाहु सॉफ्ट पॉवर काय असते. आपल्याला अपेक्षित असं साध्य करण्यासाठी कोणत्याही दबावाशिवाय दुसऱ्याला आकर्षित करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर. अशी साधी सरळ व्याख्या आहे, सॉफ्ट पॉवरची. जागतिक राजकारणात याला खुप महत्त्व आहे. सॉफ्ट पॉवर वाढवण्यात सगळ्यात मोठे घटक आहेत ते म्हणजे देशाची कला, संस्कृती आणि खेळ. आता तुम्ही म्हणालं यात तर नक्कीच भारत आघाडीवर असेल. ज्या देशात शास्त्रीय संगीत आहे. ९ प्रकारचे शास्त्रीय नृत्य आहे. खेळाविषयी बोलायचं झाल्यास. हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद, क्रिकेटचा देवही यांच देशाचा. आणि संस्कृती विषयी तर बोलायची गरजचं नाही. हजारों वर्षाची हिंदू संस्कृती लाभलेला हा देश आहे. यामुळे या गोष्टी तर आपल्या कोणीही मागे टाकू शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहेत. कारण सॉफ्ट पॉवर इंडेक्समधील यादीत भारत पहिल्या २० मध्ये सुद्धा नाही. याला कारण आहे. याआधीच्या सरकारची सॉफ्ट पॉवर वाढवण्याच्या बाबतीत असलेली उदासीनता. आपणच आपल्याला कमी लेखणं. यामुळे आपल्या देशाच्या संस्कृतीचा प्रसार पाहिजे तसा जगभर झाला नाही. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या सरकारने याकडे विशेष लक्ष दिलंय.
यासाठीच मोदींनी आपल्या संयुक्त राष्ट्रामधील पहिल्याच भाषणात २१ जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन साजरा करण्याचं आवहान जगाला केल. योग हा प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला एक अमुल्य असा ठेवा आहे. आज जगभरात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातोय. योग दिवसाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे आज युएनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
योग च्या माध्यमातून जगभरातील लोकांना प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख होत आणि आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे योग हा भारताची सॉफ्ट पॉवर वाढवण्यात कशी मदत करत आहे? ते आपण पाहू.योग दिवस साजरा करण्याच्या आधी जगातच नाही तर भारतात सुध्दा अनेक लोकांना गैरसमज होते. तर काही कट्टरपंथी लोक जाणून बुजून योग विषयी अफवा पसरवत. २०१४ च्या आधी जगभरातील लोकं योग ही एक हिंदू अध्यात्मिक साधना करण्याची पद्धत मानत. यात काही चुक नाही की, योग ही हिंदू संस्कृतीतुन निघालेली परंपरा आहे. पण योग हा काही पुजा पाठ नाही. तर ती एक शाररिक आणि मानसिक स्वास्थ सृद्ढ ठेवण्यास मदत करणारी एक साधना आहे. पण याच योग बद्दल बराच अपप्रचार ही सुरूवातीला करण्यात आला. अमेरिकेतील एक पाद्रीने तर योग हे राक्षसी कृत्य आहे. असं देखील म्हटलं होत.
पण आता या ९ वर्षात योगचा जगभरात प्रचार झालायं. इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यांसारख्या देशात हिंदू संस्कृतीचं प्रतिक असलेल्या योग चे आता क्लासेस सुरू झालेत. इराणमध्ये तर योगला खेळाचा दर्जा दिला गेलायं. युरोपीयन देशात सुध्दा योग ची प्रचंड क्रेज आहे. भारताचा सदाबहार शत्रु असलेल्या चीनमध्येसुध्दा योग चा प्रसार जोमात सुरु आहे.
योगमुळे भारताच्या संस्कृतीशी जग नुसती ओळखच करुन घेत नाही तर ती आत्मसात देखील करत आहे. एवढंच काय तर योगमुळे देशाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा देखील होतोय. आज जगभरात भारतीय योग शिक्षकांची मागणी आहे. योग सोबतचं आयुर्वेदचा पण प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे जगभरातील लोक प्राचीन अशा वैदीक ज्ञानांकडे आकर्षित होत आहेत. यामुळे नव्याने प्राचीन अशा भारतीय संस्कृतीची ओळख जगाला होतेयं. भारत आजपर्यत हार्ड पॉवरमध्ये जगातील अनेक देशापेक्षा वरचढ असला तरी भारताची खरी ताकद ही भारताची प्राचीन संस्कृती आहे. त्यामुळे भारत यांच प्राचीन संस्कृतीचा प्रचार करून जगभरात आपली सॉफ्ट पॉवर निर्माण करत आहे. त्यामुळे योगसारख्या कोणत्या गोष्टी आहेत. ज्यांचा प्रचार प्रसार करून भारत जगभरात आपली सॉफ्ट पॉवर वाढवू शकतो.