उत्तम आरोग्याचा सुयोग, "वसुधैव कुटुंबकम"करीता योग.

    20-Jun-2023
Total Views |
Article On Yoga Shastra International Yoga Day

आधुनिक जग, आधुनिक जीवनशैली, जीवनातील ताणतणाव, निरनिराळी खाद्य पदार्थ्यांनी सजलेली खाद्य संस्कृती, भेसळयुक्त पदार्थ आरोग्य रक्षणार्थ व्यायामास नापसंती किंवा ते न करण्याची वाढत चाललेली मानसिकता अशा जीवन पध्दतीमुळे आपण अनेक आजारामध्ये रुतलो गेलोय अशा या धावपळीच्या जीवनात माणसं ही आरोग्यापासून दूर होत चाललेली आहेत. या अनियमिततेत एक मोठी दरी निर्माण झाली असल्याने आपल्या आरोग्याच्या व मानसिकतेच्या तंदुरुस्तीत पिछेहाट झालेली असून अनेक आजारांना आपणांस सामोरे जावे लागते आहे कोरोनासारख्या महामारीने आपल्याला चांगलाच धडा शिकवता आहे.

त्यामुळे एवढे तर नक्की झाले आहे की जर आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपले शरीर निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नुसत्याच रासायनिक पध्दतीने गोळ्या औषधाचे सेवन करुन आरोग्यावर परिणाम करून घेण्यापेक्षा स्वतःसाठी एक तास दिला तर नक्कीच आपले आरोग्य उत्तम राहणार आहे. त्यासाठी आपणासर्वांना भारतीय प्राचीन अशा योगाचा अवलंब करण्याशिवाय पर्याय नाही. योग शास्त्र ही भारतीयांनी जगाला दिलेली मोठी देणगी आहे. त्यामुळे अनेक स्तरांवर योगाचे आपणांस बरेचसे आरोग्यदायी फायदे आहेत.

योग हा शब्द युज या संस्कृत धातू पासून बनलेला आहे. ज्याचा अर्थ आहे आल्याचे परमात्म्यांत विलीन होणे, योग ही भारतातील अनेक वर्षापासूनची जूनी आणि प्राचीन ज्ञानगली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणते, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, "योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाता स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.

आज भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर योग शास्त्राचे महत्व वाढलेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७. सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केली. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०१५ रोजी जगभरात साजरा करण्यात आला. ही भारत देशासाठी अभिमानाची बाब ठरली. आपल्या जीवनातील योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येतो. योगाबद्दल लोकामध्ये जागरूकता निर्माण व्हावी व लोकांनी योगाच्या माध्यमातून शरीराने व मनाने निरोगी राहावे हा या लेखामागचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध परिपत्रके, महत्वाची पत्रे आणि आदेशानुसार हा योग दिन साजरा करण्यांत येतो. केंद्राच्या आयुष मंत्रालयाने हर घर, आंगण योग ही टॅगलाईन दिलेली आहे.

यापूर्वी २०१७ आरोग्यासाठी योग (Yoga for health), २०१८ शांततेसाठी योग (Yoga for Peace). २०१९ हृदयासाठी योग (Yoga for Heart). २०२० कौटुंबिक योग (Yoga at Home and Yoga with Family), २०२१ कल्याणकारी योग (Yoga for well- being), २०२२ मानवतेसाठी योग (Yoga for Humanity), यंदा २०२३ साठी चिम 'वसुधैव कुटुंबकमकरीता योग (Yoga for Vasundhaiva kutumbakam) अशी असून याच थिममप्रमाणे राज्यांनी जागतिक योग दिनानिमित्त महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती ग्रामपंचायती शाळा, महाविद्यालये, विद्यापिठे, एनएसएस एनसीसी, पोलिस, योग संस्था व राज्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केलेले असून, सर्वानी याचा आनंद घेऊन एक आनंदीमय जीवन जगण्याचा मंत्र आत्मसात करण्याचा निर्धार आजच्या दिवशी करण्याची अपेक्षा आहे. अखेर आरोग्य है, तो जान और जान है तो जहाँ है. हेच सत्य आहे. नाहीतर रग्गड पैसे ऐशोआराम आहे.परंतू आरोग्यविना आणि प्रसन्न मानसिकतेशिवाय काही करण्याची किंवा खाण्याची क्षमता नसेल तर मात्र आयुष्यभर कष्ट केल्याचे फळ चाखण्यापासून पारखे होण्याचे दुर्दैव नशीबाला आल्यावाचून राहणार नाही.

 योगाचे फायदे: योगासन हे केवळ व्यायाम नाही. तर हे आपले पारीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. खरे आरोग्य तेच ज्यामध्ये शरीरासोबत मनही निरोगी राहते. योगामुळे शरीरासोबत आपले मनही निरोगी राहते. योगामुळे असाध्य आजार देखील बरे होतात त्याचप्रमाणे योग केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. योग तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतो. योगासनांमुळे खाना बळ मिळते. नियमित योगासने केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते. योगामुळे तणाव दूर होतो. चांगली झोप लागते, योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते योगाची अशी अनेक उदाहरणेही आपणास दिसत आहेत मध्यकालीन युगात हठ योगाचा विकास झाला योगाचे प्रकार :- योगाचे मुख्य सहा प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.
१) राजयोग ,२) हठयोग, ३) लययोग, ४) ज्ञानयोग,५) कर्मयोग, ६) भक्तियोग

योगशास्त्रामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, पॉपराईड वृध्दी मनोविकार, सांध्यांचे विकार आणि सद्याच्या घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी निर्माण झालेली परिस्थिती आणि जीवनशैली निर्माण झाल्याने अनेक आजार हे योग करण्यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी व रोग मुक्त होण्यासाठी आपणांस मदत होते तशीच पाव्दारे एक सकारात्मक उर्जा मिळते. या मिळणा-या सकारात्मक ऊर्जने आपले जीवन उत्तम आरोग्यमप आणि आनंदीमय बनविण्यासाठी आजच्या या जागतिक योग दिनाच्या औचित्यातून दैनंदिन जीवनांत योग आचरणति आणून सर्वांच्या सहभागातून आपले जीवन, आयुष्य सुंदर बनविण्याचा सुयोग साधा असेच आजच्या जागतिक योग दिनानिमित्त मनापासून सांगावेसे वाटते.

सुनिल धाऊ झळके
९८६०२९०३५३