अजानच काय शाळेत नमाज पठनही करु; कांदिवलीच्या शाळेत धक्कादायक प्रकार
16-Jun-2023
Total Views | 2245
मुंबई : कांदिवलीच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'आम्ही सर्व प्रकारच्या प्रार्थना लावतो.अजानच काय शाळेत नमाज पठनही करु.' असं स्पष्टीकरण शाळेकडुन देण्यात आला आहे. दि. १६ जून रोजी, कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावली गेली. यावेळी सर्व पालकांनी शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी भाजप आ. योगेश सागर उपस्थित होते. यानंतर शाळेकडून अजानबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले आणि आक्रमक झालेल्या पालकांना शाळेने आम्ही सर्व धर्मांच्या प्रार्थना लावतो असं सांगितलं. कपोल शाळेबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी नारे देत विरोध केला आहे. तर, शाळेत सकाळी मुलांना अजान शिकवली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.