नवी दिल्ली : भारताच्या सीफूड निर्यातीने २०२२-२३ मध्ये ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. भारताने आर्थिक वर्षात ६३,९६९.१४ कोटी (८.०९ अब्ज डॉलर) किमतीचे १.७ दशलक्ष टन सीफूड निर्यात केलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या एका प्रेस नोटनुसार, गोठवलेली कोळंबी ही प्रमुख निर्यात वस्तू राहिली आहे.
भारताने गोठवलेली कोळंबी निर्यात करुन ४३,१३५.५८ कोटी रुपये (५४८१.६३ दशलक्ष डॉलर) कमावले आहेत, सीफूड निर्यातीमध्ये सर्वात जास्त निर्यात होणारी वस्तू म्हणून गोठवलेल्या कोळंबीने आपले स्थान कायम ठेवले आहे. एकून निर्यातीत गोठवलेल्या कोळंबीचा वाटा ४०.९८ टक्के इतका आहे.
गोठवलेले मासे ही दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी निर्यात केलेली वस्तू आहे. भारताने गोठवलेली मासे निर्यात करुन ५,५०३.१८ कोटी रुपये (६८७.०५ दशलक्ष डॉलर) कमाई केली आहे. यूएस, चीन आणि युरोपियन युनियन भारतीय सीफूडसाठी प्रमुख बाजारपेठ आहेत. सीफूड निर्यातीतून देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. भारतात आणखी मासेमारी उदयोगात मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झालेले नाही.