लंडनमध्ये भारतीय तरुणीची हत्या!

    15-Jun-2023
Total Views |
Tejaswini Reddy


नवी दिल्ली
: हैदराबादची तेजस्विनी रेड्डी हिची लंडनमध्ये हत्या करण्यात आली आहे. ब्रिटनची राजधानी वेम्बली येथील नील क्रेसेंटमध्ये या २७ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे पीडित आणि मारेकरी दोघेही एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. तेजस्विनी रेड्डी असे मृत महिलेचे नाव आहे. तेजस्विनीसह आणखीन एका महिलेवर चाकूने वार करण्यात आले असून तिचे वय २८ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सध्या ती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना दि. १३ जून रोजी घडल्याचे लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले. सकाळी १० वाजता लंडन अॅम्ब्युलन्स सर्व्हिसला कॉल आला की दोन महिलांना चाकूने वार करण्यात आले आहे. मात्र पोलीस घटनास्थळी पोहचण्याआधीच तेजस्विनीचा मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या महिलेला उत्तर लंडन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
तो धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी (१३ जून २०२३) घडल्याचे लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले. सकाळी १० वाजून एक मिनिट आधी, लंडन अॅम्ब्युलन्स सर्व्हिसला कॉल आला की दोन महिलांना चाकूने वार केल्यानंतर जमिनीवर रक्तस्त्राव होत होता. पोलीस येण्यापूर्वीच तेजस्विनीचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या महिलेला नॉर्थ
लंडनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान आणखीन एक व्यक्तीचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्याला वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये एका महिलेचाही समावेश होता. दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ब्राझिलियन वंशाच्या व्यक्तीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तेजस्विनी तिचे ऑफिस जवळ असल्याने त्या फ्लॅटमध्ये राहायची.
 
तेजस्विनी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली. ब्राझीलमधील ही व्यक्तीही त्याच फ्लॅटमध्ये राहत होती. फ्लॅटचे स्वयंपाकघर कॉमन होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलीस अधिकृतपणे मारेकऱ्याची पुष्टी करतील आणि त्याची ओळख उघड करतील. २३ वर्षीय आरोपीला घटनास्थळापासून फार दूर असलेल्या हॅरो येथे अटक करण्यात आली. या घटनेत गुप्तहेरांची एक टीमही कामाला लागली आहे.