'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्याने विद्यार्थ्यांचे निलंबन!
14-Jun-2023
Total Views |
वाशी : नवी मुंबईच्या वाशीमध्ये दि. १२ जून रोजी सेंट लॉरेन्स शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे शाळेने दहावीच्या ६ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता ही कारवाई मागे घ्यावी यासाठी पालक संघटनेने मागणी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना शाळेत परत नाही घेतल्यास ठिय्या आंदोलनाचा इशआरा संघटनेकडून देण्यात आला आहे. पण यावर शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
दरम्यान ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी आज शाळेसमोर जय श्रीरामाच्या घोषणा देत आंदोलन केले. विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळा सोबत शाळा प्रशासनाने चर्चा केली व विद्यार्थ्यांना परत घेण्यास तयार आहोत मात्र त्यांच्या पालकांनी माफीनामा लेखी द्यावा अशी अट घातली. ही सर्व माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वाशी प्रमुख सचिन कदम यांनी दिली आहे. आंदोलन वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आला होता.