असदुद्दीन ओवैसी म्हणतात, "बस थांबवून नमाज अदा केली तर..."

    12-Jun-2023
Total Views |
aimim-chief-asaduddin-owaisi-says-what-if-passengers-offered-namaz


लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये नमाज अदा करण्यासाठी यूपी रोडवर बस थांबवल्याप्रकरणी ओवैसी यांचे वक्तव्य आले आहे. AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे की, जर दोन मुस्लिमांनांनी बस थांबवून नमाज अदा केली तर त्यात कोणती कयामत आली.

ओवैसी म्हणाले, “बस उत्तर प्रदेशातील बरेली येथून जात होती. वाटेत बस थांबल्यावर काही मुस्लिम म्हणाले, भाई, तीन मिनिटे थांबा. आम्ही नमाज अदा करतो. तिथे फक्त दोन मुस्लिमांनी नमाज अदा केली.त्यामुळे ड्रायव्हर कृष्णपाल सिंहला निलंबित करण्यात आले आणि मोहित यादवला बडतर्फ करण्यात आले.

दरम्यान या घटनेवर ओवैसी म्हणाले की, " बस थांबवून नमाज अदा केला तर काय कयामत आली का? नमाज अदा करणे हा गुन्हा असेल तर संपूर्ण सरकारी कार्यालयांमध्ये धार्मिक चिन्हे नसावीत. कोणत्याही जिल्हाधिकारी कार्यालयाचे, सचिवालयाचे उद्घाटन असो, कोणताही धार्मिक उत्सव असू नये. बस दोन मिनिटे थांबल्यावर आपण बसच्या चालकाला निलंबित केले आणि कंत्राटी कर्मचारी कंडक्टर मोहित यादव याला बडतर्फ केले" , असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.




विशेष म्हणजे ३ जून २०२३ रोजी जनरथ बस बरेलीहून गाझियाबादच्या कौशांबी स्टॉपकडे जात होती. दरम्यान बस एका ठिकाणी थांबली जिथे दोन मुस्लिमांनी खाली उतरून नमाज अदा करू लागले. या घटनेनंतर दि. ४ जून रोजी सत्येंद्र नावाच्या व्यक्तीने बस प्रवासी असल्याचे भासवत परिवहन विभागाच्या मुख्यालयातून या संदर्भात तक्रार करत ट्विट केले. आपल्या तक्रारीच्या समर्थनार्थ सत्येंद्र यांनी तिकीटासोबत एक व्हिडिओही जोडला होता.

या व्हिडिओमध्ये इस्लामिक वेषात २ लोक रस्त्यावर नमाज अदा करताना दिसत आहेत. बसमधील प्रवासी कंडक्टरने नमाजासाठी प्रवास थांबवल्याचा निषेध करताना दिसले. मात्र, या सगळ्यांना उत्तर देताना कंडक्टर त्यांना हिंदू-मुस्लिम न करण्याचा सल्ला देताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने ड्रायव्हरला निलंबित केले आणि कंडक्टरची कंत्राटी सेवा समाप्त केली.