मुंबई : 'झी मराठी' या वृत्तवाहिनीवर लवकरच 'खुपते तिथे गुप्ते' हा सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्तेंचा कार्यक्रम तब्बल नऊ वर्षानंतर आपल्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे.त्याचे काही 'प्रोमो'ज वाहिनीवर दाखवीले जात आहेत. यात अवधूत गुप्ते राज ठाकरेंना प्रश्न विचारतात की, बरसू प्रकरणात उद्धव ठाकरे व तुमचे विचार सारखेच आहेत, मग तुम्ही दोघे एकत्र येऊन याबाबत का काही नाही करत ?
त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणतात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच या प्रकल्पाचे पत्र देण्यात आले आहे. तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात, मग तुमच्या चुकांसाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. तिथे कातळशिल्प आहेत, हे त्याच्या अगोदरही जगाला माहिती होतं.कातळशिल्प कोकणात दोन महिन्यांपूर्वी सापडलेलं नाही आहे.त्यावर असंख्य लोक संशोधन करत आहेत,याचा अर्थ उद्धव ठाकरेंचे लक्ष नव्हते असाच होतो.”