राष्ट्रवादीमध्ये भावी-माजी आमदार पदावरून शर्यत !

राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांमध्ये शिरूर लोकसभा उमेदवारीवरून जोरदार शर्यत

    01-Jun-2023
Total Views |

amol kolhe



पुणे :
राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांमध्ये शिरूर लोकसभा उमेदवारीवरून जोरदार शर्यत चाललेली दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत.२०१९ मध्ये शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे इच्छुक होते.


परंतु,अमोल कोल्हे जे शिवसेनेतून ऐनवेळी राष्ट्रवादीत आले, त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ केली.त्या वेळी कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव करत शिरूरमधून खसदारकी मिळवली होती. परंतु आता लांडे पुन्हा एकदा शिरूरमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर अमोल कोल्हेना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल आमच्यासाठी.