किरीट सोमय्यांनी काढला उबाठा नेत्याचा पाचशे कोटींचा गैरव्यवहार!

    01-Jun-2023
Total Views |
 
Ravindra Waikar
 
 
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईतील ५०० कोटींचा कथित फाईव्ह स्टार हॉटेल घोटाळा प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, यात मुंबई पालिकेचे अधिकारीही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
 
मुंबई पोलिसांच्य़ा आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगर पालिकेच्या अर्ध्या डझन अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. जमिनींच्या व्यवहाराची प्रक्रिया आणि तपशील जाणून घेण्यासाठी या सहा अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ११ मार्च २०२३ यांनी या प्रकरणी लेखी तक्रार केली होती.