मंत्री मंगल प्रभात लोढांच्या पुढाकाराने कायदेशीर कारवाई
01-Jun-2023
Total Views |
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मालवणी (मालाड पश्चिम) परिसरातील बांग्लादेशी नागरिकांच्या अवैध स्थलांतराबाबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली होती. यावेळी मुंबई पोलीस आणि कलेक्टर ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणीतील अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली असून, या परिसरातील ६ हजार स्क्वेअर मीटर जागा मोकळी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ही कारवाई अशीच पुढे देखील सुरू राहणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले आहेत. यानिमित्ताने मालवणी परिसर मोकळा श्वास घेईल, अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.